नरकेवाडी अमृतधारा फार्म मध्ये सहर्ष स्वागत आहे

४० वर्ष शिक्षण,क्रीडा,दूध या क्षेत्रात सामाजिकतेचा वास उभारणारे अरुण नरके आणि त्यांचे पुत्र संदीप नरके यांच्या दूरदृष्टीतुन हि 'अमृतधारा' साकारलेली आहे. निसर्गरम्य सात एकरामध्ये गावाकडची दंगामस्ती, बैलगाडीची सफर, सायकलिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, पक्षी दर्शन, फोटोग्राफी, रस्सीखेच, टायर फिरवणे या मौजमजेसह ऍडव्हेंचर गेम्स, रेन डान्स,मड बाथची मजा घेता येणार आहे. खर्डा भाकरी,गावरान चुलीवरचे जेवण,ऊस खाण्याचा अनुभव,गायीम्हशींचे दूध, शहाळ्याची मजा, बाजल्यावरचे जेवण,फळबाजार, शेतीतील भाजी असा ग्राम्य संस्कृतीचा स्पर्शही इथे आहे. गावरान मेवा, चिक्कू, नारळ, केळी,पपई च्या बागेत नैसर्गिक जीवनाचा आनंद,वाढदिवस,मुंज, भिशी, गेट टुगेदर, ज्येष्ठ नागरिक मेळावा, रिसेप्शन, डोहाळे जेवण असे क्षण हि येथे चिरस्मरणीय बनवता येतील. महाराष्ट्रीयनपासून राजस्थानी,पंजाबी,गुजराती तसेच त्या त्या संस्कृतीतील पारंपरिक लग्नसोहळा अविस्मरणीय करता येईल, त्यासाठी नरकेवाडीच्या 'अमृतधारा फार्म' ला नक्की भेट द्या.


अभिप्राय

Hemant Panse

Everything Is Excellent No Way For Suggestions For Food Managed Very Properly.


Jaydeep Aphale

Expectations Exceeded. Greate Place & Verygood Ambience.Qualitiy Of Service Is Excellent Strongly Recommend This Place For Event. Looking Forward To Visit Again.


Ajit Shankar Pawar

It Was Wonderful Experience And Nice Place In The Kolhapur.


Anagha Vaidya

Very Nice Experience,Very Good Arrangements Especially Food Very Testy.


Vaibhav Masurkar

वातावरण छान आहे. संपूर्ण दिवस फारच छान गेला.अप्रतिम घरच्या चवीचं जेवण. संपूर्ण स्टाफच फार कौतुक. एकंदरीत सर्वच फार कौतूकास्पद व आल्हाददायक.


सुनील मोरे

अपेक्षेहून सुंदर कार्यक्रम फक्त आपल्या फार्ममुळे पार पडला ... धन्यवाद नरकेवाडी फार्म टीम.


विद्यापीठ बालवर्ग , कोल्हापूर

बालवर्गाची सहल अविस्मरणीय झाली शब्दात वर्णन करता येत नाही. सर्व सेवा अतिशय उत्तम.


श्री शाहू बालभवन तपोवन ,कोल्हापूर

बालवर्गाची सहल हि सहल न म्हणता एक आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणावा लागेल कारण न विसरनारा हा क्षण आहे.


Sakhare Family

खूप सुंदर ! व्यवस्थापन ,अगत्य ,आपलेपणा , जेवण ,माहेरी असल्यासारखे वाटले .खूप धन्यवाद ! आणि शुभेच्छा !!!


MLG Reunion

उत्तम सोय, प्रशस्त जागा, जेवण अप्रतिम आदरातिथ्य लक्ष्यात राहण्याजोगे.


पद्माकर चांडके

छान आहे, रूम पण छान, जेवण रुचदार व खूपच चांगल आहे.


श्री देविदास रमेश चौधरी

फार्म खूप आणि खूपच छान आहे, निसर्गप्रेमी साठी हा फार्म आनंदाची पर्वणी आहे. कर्मचारी वर्ग सुद्धा खूप सहकारी आहेत.