नरकेवाडी अमृतधारा फार्म मध्ये सहर्ष स्वागत आहे
४० वर्ष शिक्षण,क्रीडा,दूध या क्षेत्रात सामाजिकतेचा वास उभारणारे अरुण नरके आणि त्यांचे पुत्र संदीप नरके यांच्या दूरदृष्टीतुन हि 'अमृतधारा' साकारलेली आहे. निसर्गरम्य सात एकरामध्ये गावाकडची दंगामस्ती, बैलगाडीची सफर, सायकलिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, पक्षी दर्शन, फोटोग्राफी, रस्सीखेच, टायर फिरवणे या मौजमजेसह ऍडव्हेंचर गेम्स, रेन डान्स,मड बाथची मजा घेता येणार आहे. खर्डा भाकरी,गावरान चुलीवरचे जेवण,ऊस खाण्याचा अनुभव,गायीम्हशींचे दूध, शहाळ्याची मजा, बाजल्यावरचे जेवण,फळबाजार, शेतीतील भाजी असा ग्राम्य संस्कृतीचा स्पर्शही इथे आहे. गावरान मेवा, चिक्कू, नारळ, केळी,पपई च्या बागेत नैसर्गिक जीवनाचा आनंद,वाढदिवस,मुंज, भिशी, गेट टुगेदर, ज्येष्ठ नागरिक मेळावा, रिसेप्शन, डोहाळे जेवण असे क्षण हि येथे चिरस्मरणीय बनवता येतील. महाराष्ट्रीयनपासून राजस्थानी,पंजाबी,गुजराती तसेच त्या त्या संस्कृतीतील पारंपरिक लग्नसोहळा अविस्मरणीय करता येईल, त्यासाठी नरकेवाडीच्या 'अमृतधारा फार्म' ला नक्की भेट द्या.
अभिप्राय